समतेच्या – प्रबोधनच्या चळवळीत प्रबोधन युवाशक्तीने शिखर संस्था म्हणून काम करावे – रघुनाथ कुचिक

पुणे (पंढरी गायकवाड) – जात धर्म पंथ यामुळे माणसाची दुभंगत चाललेली मन पुन्हां जोडण्यासाठी तरुणांना आश्वासक पुरोगामी विचार गरजेचा असुन ,ही गरज यापुढील काळात प्रबोधन युवाशक्ती भरून काढेल , समता बंधुता मानवता व सामाजिक न्याय या मुल्यांवर अढळ श्रद्धा ठेवून काम करणाऱ्या राज्यातील संस्थाची शिखर संस्था म्हणून प्रबोधन युवाशक्ती ने पुढील काळात काम करावे असे मत किमान वेतन सल्लागार मंडळ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राज्यमंत्री दर्जा शिवसेना उपनेता नेते डॉ रघुनाथ कुचिक यांनी व्यक्त केले ,
प्रबोधन युवाशक्ती या क्रांतीज्योती महात्मा फुले – प्रबोधनकर ठाकरे यांच्या सत्यशोधक विचार मार्गांवर काम करण्यासाठी सुरु होत असलेल्या सामाजिक संघटनेच्या बोधचिन्ह अनावरण सोहळ्यात रघुनाथ कुचिक बोलत होते .
९ आॅगस्ट क्रांतीदिनाचे औचित्य साधून आज समता भुमी महात्माफुले वाडा येथे सदरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा फुले मंडळाचे मधुकर राऊत ,सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा पाटील , हनुमंत टिळेकर ,सुरेश कालेकर , रोहित मुंडे,शुभम दिघे,विकी भोंसले,राहुल गोयल,प्रफुल सारडा,राहुल वोहरा इ मान्यवर उपस्थित होते .प्रमुख पाहुण्यांचे स्वागत प्रबोधनकार ठाकरे यांचे विचारधन पुस्तक देउन करण्यात आले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यवाह सचिन पाटील यांनी तर आभार प्रा भाऊराव खुणे यांनी व्यक्त केले .कार्यक्रम यशस्वीतेसाठी संदीप वाघमारे ..इ परीश्रम घेतले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here