जनमत प्रतिष्ठानतर्फे जिल्हा कारागृहाचे सॅनिटायजेशन

शासकीय रुग्णासयाचे डीन डॉ.जयप्रकाश रामानंद यांचा कोविड योध्दा सन्मान
जळगांव (संपादक सुनिल पाटील) – जनमत प्रतिष्ठान व कुणाल जडे मार्फत जळगावातील कोविड चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील जनमत प्रतिष्ठान व कुणाल संजय जडे यांच्याकडून विविध ठिकाणी सॅनिटायझेशन करण्याचा उपक्रम सुरु आहे.
आज (दि.९) जनमत प्रतिष्ठान व कुणाल जडे यांनी जिल्हा कारागृह संपूर्णपणे सॅनिटायजेशन केले. तसेच शासकीय रुग्णालयाचे डीन डॉ.जयप्रकाश रामानंद यांना जनमत प्रतिष्ठानतर्फे कोविड योध्दा म्हणून सन्मानित करण्यात आले. यावेळी शिक्षक भारती संघटनेच्या अध्यक्ष शितल ताई जडे, कुणाल जडे, हर्षाली पाटील, जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले व कुणाल जडे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here