जळगाव (संपादक सुनिल पाटील) – आपल्या सेवाभावी वृत्तीने आणि मराठा समाजाच्या विकासासाठी अहोरात्र परिश्रम घेणारे धरणगाव
नगरपालिके माजी नगराध्यक्ष प्रा.पी.एम.पाटील यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्त त्यांचे अभीष्टचिंतन व भावी उत्तुंग वाटचालीसाठी बुलंद पोलीस टाइम्स परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा!
धरणगांव नगर पालिकेच्या १५०वर्षाच्या इतिहासात मराठा समाजाचे पहिले नगराध्यक्ष होण्याचा मान मिळविणारे समाजातील सर्व घटकांचे श्रद्धास्थान असलेले दादासो पी.एम.पाटील सर. समाजकारणाच्या माध्यमातून समाजाची सेवा करताना सातत्याने समाज प्रगतीचे विचार त्यांच्या मनात असतात. त्यांच्या आजवरच्या समाजकार्याच्या कारकिर्दीत समर्पकता, सृजनशीलता, विश्वास, पारदर्शक, साहस, परिश्रम, प्रेरणा यासारखे नेतृत्व गुण अंगी बाळगून सामाजिक बांधिलकी जोपासताना सकारात्मक विचाराने ध्येय-स्वप्नं पूर्ण करण्यासाठी चिकाटी-जिद्दीने अफाट मेहनत करून समाजातील सर्व घटकांना आपल्या सोबत घेऊन त्यांनी सामाजिक क्षेत्रात समाजाच्या विकासासाठी निस्वार्थ वृत्तीने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
आज त्यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त आई भवानी तुम्हाला उदंड आयुष्य व बलदंड शक्ती देओ, समाजकारणातील सर्वोच्च पद मिळण्यासोबतच भावी वाटचाल उत्तुंग होवो, ही सदिच्छा. तसेच त्यांना वाढदिवसानिमित्त जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, जिल्हाप्रमपख गुलाबराव वाघ, धरणगावातील आर एच पाटील, अॅड.दिनकर पाटील, धर्मा पाटील, नंदकिशोर पाटील,सौ.आराधना पाटील, दिलीप पाटील, योगेश पी पाटील, बाळासाहेब योगेश पाटील तसेच धरणगाव नगरपालिका नगराध्यक्ष निलेश चौधरी, सर्व नगरसेवक, महाआघाडीमधील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत.







