जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट; आज आढळले ४५६ कोरोनाबाधित

Blood sample tube positive with COVID-19 or novel coronavirus 2019 found in Wuhan, China

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. आज (दि.९) कोरोना संशयितांचे स्वॅब तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यात 456 कोरोनाबाधित रूग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या 14 हजार 343 झाली आहे. सर्वाधिक 96 कोरोबाधित रुग्ण हे अमळनेर तालुक्यात आढळून आले आहेत. दिवसभरात 7 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 285 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
आज आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर 77, जळगाव ग्रामीण 14, भुसावळ 15, अमळनेर 96, चोपडा 56, पाचोरा 33, भडगाव 13, धरणगाव 27, यावल 4, एरंडोल 18, जामनेर 31, रावेर 18, पारोळा 24, चाळीसगाव 9, मुक्ताईनगर 13, बोदवड 6 इतर जिल्ह्यातील 2 अशी रूग्ण संख्या आहे. दिवसभरात 7 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहरात 2 तर चोपडा, जामनेर, अमळनेर, मुक्ताईनगर, पाचोरा तालुक्यातील प्रत्येकी एका बाधीत रुग्णांचा समावेश आहे. अशी माहिती अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here