पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : पत्नीकडून सातत्याने दिल्या जाणाऱ्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून एका पतीने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस. वार्षिक पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
प्रकाश संभाजी चौघुले (वय ३३, रा. वारजे) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात त्याच्या २८ वर्षीय पत्नीवर भादवी कलम ३०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत प्रकाश यांचे भाऊ गिरीष यांनी तक्रार दिली आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, काही वर्षांपूर्वी महेश प्रकाश आणि आरोपी महिलेचा विवाह झाला होता. एका खासगी कंपनीत तो नोकरी करत होते. दरम्यान लग्न झाल्यानंतर पत्नी कडून वेळोवेळी शारीरिक आणि मानसिक त्रास होत असल्यामुळे प्रकाश हे नैराश्यात होते. पत्नीने त्यांच्याविरोधात खोट्या तक्रारी केल्या. तर, नातेवाईक व प्रकाश करत असलेल्या कंपनीत त्यांची बदनामी केली. तिच्या त्रासाला कंटाळून प्रकाश यांनी गेल्या आठवड्यात कोणतेतरी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. वारजे माळवाडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहेत.






