मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : समीर वानखेडे यांच्या जात पडताळणीमध्ये हिंदू दलित समाजाचे कार्ड वापरून वानखेडे परिवाराने रिपाइं नेते, केंद्रीय सामाजिक न्यायमंञी रामदास आठवले यांची भेट घेतली. आम्ही आंबेडकरीवादी आहोत, असे त्यांनी घोषित केले आहे. परंतु एवढया दिवसात हे कुंटूंब कधी हिंदू – हिंदू म्हणत होते. आता ते आंबेडकरवादी असल्याचे सांगत आहेत. ते आंबेडकरवादी आहेत हा खोटा अपप्रचार कदापि आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा भीम आर्मी भारत एकता मिशनचे राष्ट्रीय महासचिव अशोकभाऊ कांबळे यांनी दिला आहे.
केंद्रीय मंञी रामदास आठवले हे आमचे नेते आहेत. पॅथर आहेत. त्यांचा आंबेडकरी समाज सन्मान करीत असतो. परंतु त्यांनी समीर वानखेडे यांना पाठीशी घालू नये, असेही कांबळे म्हणाले. समीर वानखेडे हे आंबेडकरीवादी असते तर त्यांनी आंबेडकरी चळवळीत योगदान दिल्याचे अन्यथा आंबेडकरवादी असल्याचा एखाद्या पुरावा सोशल मिडीयावर सादर करावा, असे आव्हान भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोकभाऊ कांबळे यांनी बोलताना दिले आहे.
या संदर्भात लवकरच राज्याच्या सामाजिक न्याय विभागाला व राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग जात पडताळणी समितीला भेटून समीर वानखेडे यांच्या जात पडताळणीची चौकशी करण्यास पञव्यवहार करून पञकारांना माहिती देणार असल्याचेही कांबळे यांनी सांगितले.






