आरपीआय महिला पदाधिकारी पूजा आंबेकर यांचा चाकूने भोसकून खून

नाशिक (विशेष प्रतिनिधी) : शहरातील आरपीआय महिला पदाधिकारी पूजा आंबेकर रात्रीच्या सुमारास पूजाची हत्या करण्यात आली आहे. २० ते २५ वार करुन निर्घृण हत्या मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पूजा आंबेकर या आरपीआयच्या पदाधिकारी होत्या.

रात्रीच्या सुमारास संत कबीर नगरमध्ये राहत्या घरात त्यांची हत्या करण्यात आली. ही हत्या इतक्या निर्घृणपणे करण्यात आली की, आरोपीने पूजा आंबेकर यांच्यावर चाकूने तब्बल २० ते २५ वार केले. सोबत राहणाऱ्या इसमानेच हत्या केली असल्याचा संशय आहे. संबंधित संशयित आरोपी हा अट्टल गुन्हेगार आहे.

त्याच्यावर यापूर्वी शहरात दोन खुनाचे गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून गंगापूर पोलीस या संशयित आरोपीचा शोध घेत आहेत. दरम्यान ऐन दिवाळीत झालेल्या या घटनेने संपूर्ण नाशिक जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here