छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याबद्दल पुणे शिवसेनेतर्फे कर्नाटक सरकारचा निषेध

पुणे (पंढरी गायकवाड) – महाराष्ट्राचे आराध्य दैवत छञपती शिवाजी महाराज यांचा पुतळा रातोरात गायब करणाऱ्या कर्नाटक सरकार विरोधात आज महाराष्ट्रभर आंदोलन सुरु आहेत आज शिवसेना शहर प्रमुख संजय भाऊ मोरे यांच्या सुचनेने व वडगावशेरी मतदारसंघाच्या वतीने नगरसेवक श्रेञप्रमुख संजय शशिकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली चंदन नगर भाजी मंडई येथील छञपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोर कर्नाटकच्या मुजोर मुख्यमंत्री यांच्या प्रतिमेस जोडे मारून व निषेध करून शिवसैनिकांनी आक्रोश व्यक्त केला यावेळी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व महिला आघाडी युवासेना उपस्थित होते.
पुणे शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांच्या मार्गदर्शनानुसार, आज वडगाव शेरी मतदार संघ पुणे इथे बेळगावमधील मनगुत्ती या गावतील छत्रपती शिवरायांचा पुतळा रातोरात हलविणाऱ्या कर्नाटक सरकारचा जाहिर निषेध करण्यात आला. कार्यक्रमाला शिवसेना नगरसेवक संजय भोसले, शिव्सेना विभाग प्रमुख – विनोद परहाड, विनोद कर्ताल, संजय वाल्हेकर, आबा निकम, प्रशांत शिंदे, मोह्मद शैख, राहुल शेडगे, युवसेना – विभाग प्रमुख प्रसाद जठार, हर्षवर्धन पवार, सुनिल गोरे, महिला आघाडीच्या अमृत ताई पठारे, साधना ताई भागत व अन्य महिला उपस्थित होत्या. वडगावशेरी शिवसेना, युवासेना,व माहिला आघाडीच्या वतीन कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here