मुंबई (गणेश तळेकर) – कर्नाटक, बेळगाव जिल्हा मध्ये मंणगुती गावातील शिवरायप्रेमींनी श्री छत्रपती शिवरायांचा पुतळा बसविला होता .शनिवारी पहाटे अचानक चबुतरावरुन श्री छत्रपती शिवरायांचा पुतळा हटविल्याने बेळगाव जिल्ह्या सह संपूर्ण महाराष्ट्रात याबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी मुंबई येथील शिवसेना भवन येथे शिवसेनेच्या माझी महापौर , नगरसेविका सौ.श्रद्धा जाधव यांच्या आदेशानुसार सर्व विभागीय पदाधिकारी आणि शिवसैनिक यांनी जमा होऊन वतीने कर्नाटक सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. कर्नाटक शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे शिवरायांचा पुतळा उतरवणे हे अत्यंत निंदनीय प्रकार आहे. दोन दिवसात आहे त्या ठिकाणी शिवरायांचा पुतळा बसविला नाही तर कर्नाटकात जाऊन शिवसेना स्टाईलने अंदोलन करु असा इशारा मुंबई जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला.











