जळगाव (महाराष्ट्र क्राइम रिपोर्टर निखिल ठाकूर) : लक्ष्मीपूजन दिवाळी निमित्ताने धर्मरथ फाउंडेशने सालाबादप्रमाणे यंदाही आगळ्या वेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी केली.
सणवार न पाहता नियमितपणे गटार,कचरा साफसफाई करणारे कर्मचारी आणि अग्निशमन दल कर्मचारी नेहमी काम करत असतात.या निमित्ताने यांनी त्यांच्या काम करण्याची पद्धती आणि त्यांना होणारा त्रास आमच्या समोर व्यक्त केला आणि अग्निशमन दल रोज धूळ उडू नाही म्हणून नेहमी पाणी रोड वर मारतात त्यांचे ही आम्ही धर्मरथ फाउंडेशन परिवाराने आभार मानले
यावेळी दिवाळी निमित्ताने धर्मरथ फाउंडेशन परिवाराने यंदा त्यांच्या सोबत दिवाळी साजरी केली त्यांना मिठाई व फराळ देऊन त्यांना शुभेच्छा आणि धन्यवाद मानले त्या वेळी शुभेच्छा देताना धर्मरथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विनायक पाटील,संतोष भिंताडे, धनंजय चौधरी,मिलिंद बडगुजर व परिसरातील नागरिक उपस्थित होते.






