घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात

जळगाव (क्राइम रिपोर्टर शाहिद खान) : शहरातील मासूमवालडीनजीक सैयद असरार नगर येथील रहिवासी शेख सलीम शेख रशीद यांच्याकडे झालेल्या घरफोडीचा एमआयडीसी पोलिसांनी लावला आहे. १ नोव्हेंबरच्या रात्री शेख सलीम हे आपल्या परिवारासह दरवाजा बंद करुन झोपले होते. दुस-या दिवशी सकाळी त्यांना आपल्या घरातील सामान अस्ताव्यस्त दिसून आले होते.

या घरफोडीत मोबाइल रोख रक्कम , व दागिने व इतर वस्तु असा एकुण ५५ हजार ५०० रूपीयांच्या मुद्देमाल घरातुन गायब झालेला होता. या प्रकरणी तपास एमआईडीसी पो.नि प्रताप शिकारे, यांना समझलेल्या महितीच्या आधारे रिकॉर्ड वरील गुन्हेगार वसीम कबीर पटेल, (वय २२ रा. नशेमन कॉलनी जळगाव) यास चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले.

तपास पथकातील सहायक फौजदार अतुल वंजारी, हे.का, रामकृष्ण पाटिल, पोलिस नायक सैयद इमरान, पो. नायक योगेश बारी, पो.कॉ सचिन पाटील, किशोर पाटिल, गोविंदा पाटिल, सुधीर साळवे, व मुकेश पाटिल, यांनी त्याला बोलते केले. त्याने आपला गुन्हा कबुल केला. त्याच्या ताब्यातुन गुन्हातील चोरी केलेल्या मुद्देमालपैकी सात हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल २३ हजार रूपय किमतीच्या चांदीच्या विविध आकाराच्या दोन अंगठया ८ ग्राम वजनाचे चांदीच्या पेंडल, व पाचशे रुपये किंमतीचे पितळी भांडे असा एकुण ३० हजार ५०० किमतीच्या मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या घरफोडीचा गुन्हा तातडीने उघडकीस आणला गेला असून, अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here