नवी दिल्ली (उपसंपादक जीवन षाकया) : यंदा घोषित करण्यात आलेल्या पद्म पुरस्कारांचे आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. २०२० आणि २०२१ या दोन्ही वर्षांचे पुरस्कार यंदा वितरित करण्यात आले. महिला बॉक्सर मेरी कोम हिला पद्मविभूषण पुरस्काराने तर ऑलिम्पिक डबल पदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मेरी कोमने लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते. याशिवाय तिने पाच वेळा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक तसेच एक रौप्य आणि कांस्यपदक जिंकले आहे. तर टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये कांस्यपदक जिंकणारी भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने रिओ ऑलिम्पिक २०१६ मध्येही रौप्यपदक तर टोकियो ऑलिम्पिकमध्ये कास्यपदक जिंकले होते.
Congratulations to 'Magnificent Mary' Smt @MangteC Ji on receiving the Padma Vibhushan for Sports. Not only is she a Boxing legend but also an inspiration to millions of Indians.@PMOIndia pic.twitter.com/Hog3lWSIYj
— N.Biren Singh (@NBirenSingh) November 8, 2021
माजी वेगवान गोलंदाज झहीर खानला पद्मश्री पुरस्कार २०२० ने सन्मानित करण्यात आले. झहीर खानची गणना सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये केली जाते. मणिपूरची फूटबॉलपटू ओइनाम बेंबिम देवी हिला पद्मश्री पुरस्कार २०२० ने सन्मानित करण्यात आले आहे. माजी हॉकीपटू एम. पी. गणेश यांनाही पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नेमबाज जितू राय यांना पद्मश्री पुरस्काराने बहुमानित करण्यात आले. तिरंदाज तरुणदीप राय यांना पद्मश्री पुरस्काराने, महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल यांनाही पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले.
Delhi: Olympian badminton player PV Sindhu awarded the Padma Bhushan pic.twitter.com/TqUldnQgr3
— ANI (@ANI) November 8, 2021






