जलगांव (क्राइम रिपोर्टर असलम खान) : रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा ५२ हजार रूपयांचा ऐवज बंद घराचे कुलुप तोडुन चोरुन नेणा-या आरोपी ९ नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. वसीम कबीर पटेल ( नशेमन कॉलनी मास्टर कॉलोनी जळगाव) असे एमआईडीसी पोलिसांच्या अटकेतील सराइत आरोपीचे नाव आहे.
एमआईडीसी पोलिसांचा गुन्हे शोध पथकाने त्याला आज न्यायालयात हजर केले. न्यायालयने ९ नोव्हेंबरपर्यंत त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे. शेख सद्दाम अब्दुल वाह्ब ( रामनगर महेरुण जळगाव ) हे १७ जुन २०२१ रोजी घरात कुलुप लावुन बहेर गेले होते. त्यावेळी त्यांचा घराचे कुलुप तोडुन अज्ञात चोरट्याने प्रवेश मिळवत ऐकुण ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला होता. या प्रकरणी एमआईडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या तपासात वसीम कबीर पटेल, यास अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता ९ नोव्हेंबर परिजन पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सराइत गुन्हेगार वसीम याच्याविरुध्द एमआईडीसी पोलिस स्टेशनला चोरीचे विविध गुन्हे दाखल आहेत. आरोपी वसीम पटेल यास सालार नगर येथील घरफोडीच्या गुन्हात अटक करण्यात आली होती. पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी चौकशी केली असता त्यांने सदर गुन्हाची देखील कबुली दिली. त्यापरमाणे त्याला सदर गुन्हात अटक करण्यात आली. वसीम पटेल हा रिकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने व तो त्याच परीसरात चोरी करत असल्याने त्याच्यावर पोलिसांचा संशय होता. त्याने सदर गुन्हाची कबुली दिली असुन त्याच्यावर आधी ५ घरफोडी गुन्हे दाखल आहेत. त्याला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर सदरचा गुन्हा उघडकीस आला आहे. सहायक फौजदार अतुल वंजारी, सैयद इमरान, संजय धनगर, किशोर पाटिल, सचिन पाटील, हेमंत कळसकर, यांनी या कारवाई सहभाग घेतला.






