कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न

कोल्हापूर (महाराष्ट्र क्राइम रिपोर्टर सतीश चव्हाण) : ताराराणी सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री सतेज पाटील व आमदार प्रकाशआण्णा आवाडे व जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या उपस्थितीत पार पडली.

यावेळी आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी इचलकरंजीतील आदिवासी फासेपारधी जमातीचे जास्तीत जास्त लोक हे सेंट्रिंग व्यवसायात आहेत. अशा फासेपारधी समाजातील लोकांना घरकुलासाठी अनुदान मिळावे. तसेच त्यांना जातीचे दाखलेही सुलभरित्या मिळावेत, कबनूर, चंदूर, रुई या तिन्ही गावांच्या मध्यंतरी आभारफाटा येथे आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी बांधलेल्या बचत गटाच्या हॉल मध्ये आरोग्य केंद्र सुरु करावे असा मुद्दा आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी सभागृहात मांडला. यावेळी हा प्रस्ताव पालकमंत्र्यांनी मंजूर केला, लाईटबिल कनेक्शन संदर्भात माणगांवचे सरपंच राजू मगदूम यांनी उपोषण केले होते. जोपर्यंत लाईटबिल कनेक्शन कट करणे थांबवत नाही, तोपर्यंत जिल्हा नियोजन समितीची सभा चालू देणार नाही, अशी भूमिका आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी घेतली व या मतावर ते ठाम राहीले. यावर महावितरण अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीचे कनेक्शन तोडणार नाही असे आश्वासन दिले, वारंवार मागणी करून देखील ब्रेक टेस्ट पासिंग ट्रॅकचे उद्धाटन होत नसल्याने काम रखडले गेले आहे त्यामुळे वाहन धारकांना वारंवार त्रास सहन करावा लागत आहे, यावर ऑनलाईन पद्धतीने हे काम सुरु करावे अशी मागणी आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी केली. या मागणीवर पालकमंत्री तथा परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी १३ नोव्हेंबर रोजी उद्धाटन करू, असे जाहीर केले, इचलकरंजी शहराला जोडल्या गेलेल्या अनेक रस्त्यांची अधिवेशनाच्या बजेटमध्ये मंजुरी मिळाली आहे तरी या रस्त्यांची कामे अद्याप सुरू झालेले नाहीत ही कामे त्वरित सुरू व्हावीत अशी मागणी आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी केली.

mla-satej-patil

त्याचबरोबर इचलकरंजीतील आयजीएम हॉस्पिटलमध्ये कंत्राटी पद्धतीने भरती करून घेतलेल्या कामगारांचे पगार अजून प्रलंबित आहेत, ते लवकरात लवकर त्यांना मिळावे, औद्योगिक वसाहतीच्या पायाभूत सुविधांसाठी राज्यशासनाकडून २ वर्षापूर्वी निधी प्राप्त झालेला असून देखील कामे सुरु होत नाहीत हे दुर्दव आहे, मंजूर झालेला निधी तातडीने उपलब्ध करून दयावा तसेच हे काम लवकरात लवकर चालू व्हावे असे आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी सांगितले.

यावेळी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार धैर्यशील माने, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजय चव्हाण, जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, कोल्हापूर मनपा आयुक्त कादंबरी बलकवडे यांच्यासह सर्व आमदार व जिल्हा नियोजन समिती सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here