राजाराम तलाव परिसराच्या विकासासाठी पर्यटन क वर्ग योजनेत समावेश : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय

कोल्हापूर (महाराष्ट्र क्राइम रिपोर्टर सतीश चव्हाण) : मंगळवारी कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पालकमंत्री ना. सतेज (बंटी) डी. पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी, सुरक्षित रित्या गणेश विसर्जन करण्यासाठी जिथे विसर्जन केले जाते त्याठिकाणी कन्व्हेअर बेल्ट उभा करून सुरक्षित विसर्जन करता येईल अशी संकल्पना मांडली. यासंदर्भातील प्रेजेंटेशन बैठजकीत सादर करण्यात आले. जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी या संकल्पनेचे कौतुक केले असून या संकल्पेनाला अनुमोदन दिल्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.

याचसोबत, वर्षाला ५० हजाराहून अधिक पर्यटक भेट देत असणाऱ्या दक्षिण मतदारसंघातील राजाराम तलाव परिसराचा विकास करण्याकरीता जिल्हा नियोजन समितीच्या पर्यटन क वर्ग योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. यामुळे रंकाळा तलावाच्या धर्तीवर हा परिसर विकसित केल्यास शहराच्या सौंदर्यात भर पडण्यास मदत होणार आहे.

कोल्हापूर शहरामध्ये प्रमुख रस्ते मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांची साफसफाई केवळ मनुष्यबळामार्फत काढणे फार कठिण होते. अशीच परिस्थिती जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रामध्येही होत आहे. या दैनंदिन अडचणींवर मात करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने स्वीपिंग मशीन चा वापर करणे आवश्यक आहे. या एका यंत्राची अंदाजे किंमत रु.4 लाख 50 हजार पर्यंत असून कोल्हापूर महानगरपाकेस १० स्वीपिंग मशीनची मागणी यावेळी केली.

या बैठकीला आरोग्यराज्य मंत्री ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार, जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here