पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : जिल्ह्यातील दौंड येथील वडार गल्ली येथे मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास राहुल नाना घाडगे (वय-२८ रा. सिद्धार्थनगर, दौंड) यांच्या अंगावर बांधकाम पडून त्यांचा मृत्यू झाला.
दौड शहरातील वडार गल्ली येथील रणजीत नगरकर यांच्या घराचे बांधकाम सुरु आहे. त्या बांधकामाचे तोंडी कंत्राट रवी घाडगे व त्यांचा भाऊ राहुल घाडगे यांना देण्यात आले आहे. सकाळी बांधकामाच्या सेंट्रींगच्या फळ्या काढण्याचे काम सुरु असताना पोटमाळ्याचा कॉक्रिटचा बीम अंगावर पडल्याने राहुल घाडगे हा त्याखाली सापडून जागीच मृत्यूमुखी पडला.
मयत राहुल याच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, दोन भाऊ असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह दौंड उप जिल्हा रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.






