गोरखपूर (उत्तरप्रदेश) : जिल्ह्यात घरावर पाकिस्तानचा झेंडा फडकावल्याचा आरोप ठेवत चार जणांवर ‘देशद्रोहा’चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून याबद्दल पोलिसांत तक्रार आली होती.
विश्व हिंदू परिषदेचे नेते अमित वर्मा, आरएसएसचे नेते वीरेंद्र यांच्यासहीत अनेक भाजप नेते आणि कार्यकर्ते घटनास्थळी उपस्थित झाले होते. ‘ब्राह्मण जनकल्याण समिती’चे राष्ट्रीय अध्यक्ष कल्याण पांडेय यांनी यासंबंधी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी चार जणांविरोधात ‘देशद्रोहा’चा गुन्हा दाखल केला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोत एका घरावर पाकिस्तानचा झेंडा फडकत असल्याचा दावा करण्यात आला होता. हा झेंडा गोरखपूर जिल्ह्यातील चौरीचौराच्या मुंडेरा बाजारात वॉर्ड क्रमांक – १० चा रहिवासी असेलल्या तालिब नावाच्या व्यक्तीच्या घराच्या छताचा असल्याचाही यात दावा करण्यात आला होता.
Home राष्ट्रीय उत्तरप्रदेश घरावर पाकिस्तानी झेंडा फडकावल्याचा आरोपावरून चौघांवर ‘देशद्रोहा’चा गुन्हा






