तुळजापूर (प्रतिनिधी) : कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या नावाने बोगस वेबसाईट काढून लाखो रुपयाची लूट केल्या प्रकरणी तुळजापूर पोलिसांनी तुळजापूर येथील केदार दीपक लसणे याला अटक केली. पोलिसांनी या आरोपीला कोर्टात हजर केले असता त्याला १३ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
या प्रकरणात मोठे नेते व बडे अधिकारी तसेच बोगस वेबसाईट चालू होणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात उस्मानाबाद येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी कारवाईची मागणी केली होती. तुळजा भवानीच्या नावाने ऑनलाईन पैसे मागवून पूजाअर्चा कुलाचार करण्यासाठी लाखो रुपयाचे रॅकेट सुरू होते.
केदार दीपक लसणेसह इतर ४ आरोपीच्या विरुध्द कारवाई करण्याचे आदेश उस्मानाबाद जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले होते. या आदेशानुसार मंदिर संस्थानचे सहाय्यक व्यवस्थापक अनिल चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून तुळजापुर पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला होता.
Home पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या नावाने बोगस वेबसाईटच्या माध्यमातून लाखो रुपयाची केली लूट






