मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : मानखुर्द येथील मंडाळा भंगार बाजारातील गोदामाला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. सुदैवानं आगीत कोणी जखमी झालेलं नाही. मात्र, प्रचंड आर्थिक नुकसान झालं आहे. ही आग नेमकी कशी लागली हे समजू शकलेलं नाही.
पहाटे पावणे तीन वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. त्यानंतर काही वेळातच अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे १२ फायर इंजिन व १० टँकर्स घटनास्थळी पोहोचले आहेत.
#WATCH | Fire breaks out in Mandala scrap market godowns in Mankhurd area of Mumbai
"We got info about the fire at around 3 am. 12 fire engines, 10 tankers along with 150 firefighters have been deployed for fire fighting operation. No casualty reported," said a fire officer pic.twitter.com/Zaf6KdkIcN
— ANI (@ANI) November 12, 2021
तब्बल १५० जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यानं दिली. हा परिसर गर्दीचा व दाटीवाटीचा आहे. आग इतरत्र पसरू नये म्हणून अग्निशमन दलाला काळजी घ्यावी लागत आहे.






