त्रिपुरा घटनेचा निषेध रॅलीला मालेगावात हिंसक वळण

मालेगाव (प्रतिनिधी आकाश सावंत) : रिपुरात मुस्लीम समाजावर होत असलेल्या कथित अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर राज्यात विरोध दर्शविणारी रॅली शुक्रवारी ( १२ नोव्हेंबर) काढण्यात आली होती. या रॅलीला हिंसक वळण लागले. अनेक ठिकाणींनी दुकानांची तोडफोड केली तर काही दुकानं जबरदस्तीने बंद करण्यात आली. राज्यातील मालेगाव, नांदेड आणि अमरावती या ठिकाणी रॅलीला हिंसक वळण आलं.

मालेगाव येथे त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाकडून बंद पाळ्यात आला होता. परंतु, रॅलीत मोठ्या संख्येने लोकांनी सहभाग घेतला होता. यावेळी जमावाने पोलिसांवर दगड फेक केल्याची घटना घडली. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.

malegaon

यात जमावानं पोलिसांवर दगडफेक केल्यामुळे रॅलीला हिंसक वळण आलं. यामुळे जमावावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची माहिती मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here