फुलारी साहेब मी तुमच्या दारात बसलोय; उपविभागीय कार्यालयासमोर आजचा तिसरा दिवस आमरण उपोषण सुरू

अहमदपूर (प्रतिनिधी अजय भालेराव) : शहरातील कोतवाड वाईन शाँप च्या मालकी हक्कात मुख्याधिकारी यांनी हुकूमशाही करुन जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करुण गैरअर्जदार यांनी अपिलाचा वेळ असताना आदेशास न जुमाणता नं.८ मध्ये फेरबदल केला असुन मुख्याधिकारी यांनी आर्थिक व्यवहार करुन नियमांचे उल्लंघन करुन हुकूमशाही केली आहे तर दुय्यम निबंधक अधिकारी जी.आर.पवार यांनी त्या न.नं ८ चा आधार घेऊन तातडीने शासनाचे नियम पायदळी तुडवून सर्वे नंबर असताना त्यास घरेदीघर होत नसल्यामुळे गावठाण दाखवून त्या मालमत्तेस बक्षीस पत्र करूण दिले आहे या दोन्ही अधिकार्यांनी आर्थिक व्यवहार करुण हा व्यवहार पुर्ण केल्यामुळे त्यांना तात्काळ निलंबीत करण्यात यावे या मागणीसाठी येथील उपविभागीय अधिकारी प्रविण फुलारी यांच्या कार्यालयासमोर ८ नोव्हेंबर पासुन लक्ष्मण अलगुले हे आमरण उपोषण करीत आहेत पण फुलारी यांनी अद्याप उपोषणाची दखल घेतलेली नाही.

अहमदपूर शहरात असलेले कोतवाड वाईन शाँप ही मुळ मालक पंढरीनाथ कोतवाड यांच्या नावे होती, त्यांच्या मृत्युनंतर मुलगा चंद्रकांत कोतवाड यांच्या नावे झाले, चंद्रकांत हे लक्ष्मण अलगुले यांचे मामा असल्यामुळे त्यांच्या आजार पणात सेवा केल्यामुळे व लक्ष्मण यांच्या वर चंद्रकांत यांचा जास्त जिव्हाळा असल्यामुळे लक्ष्मण यांच्या नावे चंद्रकांत यांच्या हयातीत मृत्यु पत्र केले,इ.स. २०११ मध्ये चंद्रकांत ची आई सुलोचना, शशिकला यांसह बहिणी अश्या एकुण ८ जणांचा वाईन शाँप चा रजिस्टर हक्कसोड सन २०११ ईसवी ला करुण घेतला आहे, त्यामुळे चंद्रकांत यांच्या दोन आईसह बहिनींचा वाईन शाँप वर कसलाच अधिकार राहिला नाही.

चंद्रकांत कोतवाड यांनी लक्ष्मण आलगुले यांना २६ मार्च २०१५ रोजी मृत्यु पत्र करुण दिले ज्यात चंद्रकांत यांचे कोतवाड वाईन शाँप सह राहत्या घरासहीत सर्व मालमत्ता व बँकेतील जमा सर्व रक्कम मृत्यु पत्रातुन लिहुण दिली, ज्यामध्ये आई सुलोचनास बँकेत जमा रक्कमे पैकी केवळ १० लक्ष रुपये द्यावेत, असे नमुद करण्यात आले आहे. तदनंतर चंद्रकांत यांचे सन१५/८/२०१५ ला निधन झाले.

सुलोचनाबाई यांनी सन २०१८ ला तत्कालीन जिल्हाधिकारी जी.श्रिकांत यांच्या दालनायत वाद जाऊन त्यावर श्रिकांत यांनी सुलोचना यांच्या नावे केवल वारसाच्या आधारावर शाँप नावावर केली मात्र मालमत्ता ही चंद्रकांत यांच्याच नावार होती.तद नंतर लक्ष्मण यांनी कोर्टातुन मृत्यु पत्रा आधारे कोर्ट डिग्री करुण घेऊन सन २०२० रोजी न.नं.८ वर नाव नोंदणी करुण घेण्यासाठी अर्ज दिल्यावरुन सुलोचना विरुद्ध न.प.अहमदपूर येथे दावा चालवून मुख्याधिकारी यांनी लक्ष्मण यांच्या नावे मालमत्ता केली.

सुलोचनाबाई यांनी या निर्णया विरुद्ध जिल्हाधिकारी यांच्याकडे अपिल केल्यावरुन जिल्हाधिकारी यांनी मुख्याधिकारी यांचा निर्णय रद्द केला, पण मुख्याधिकारी यांनी लागलीच लक्ष्मण यांचे नाव तर हटविलेच पण अपिल करावयाच्या वेळेच्या आतच नियम बाह्य सुचोलनाबाई यांच्याशी हात मिळवणी करुन हुकूमशाहीने लक्ष्मण अलगुले यांचे नाव असताना सुलोचना यांचे लावले,पण मुळात हि मालमत्ता चंद्रकांत व सुलोचना यांच्या नावे असताना केवल सुलोचनाचे नाव मालमत्तेवर लावले ज्याचा आधार घेऊन सुलोचनाबाई यांनी दुय्यम निबंधक अधिकारी यांच्याशी हात मिळवणी करुण लागलिच ती मालमत्ता बक्षीस पत्रा च्या आधारे चुकीचे कागद पत्र देऊन मुलगी अरुणा यांचे नावे करुन घेतली व या ऊपरी मुख्याधिकारी यांना पुन्हा चुकीचे काम करुण घेण्यासाठी नमुना आठ अ वर मुलीचे नाव लावण्यासाठी न.प.कार्यालयात दिले आहे .दोण दिवसापासून आमरण उपोषन सुरू असुनही उपविभागीय अधिकारी यांना उपोषणास भेट न दिल्याने लक्ष्मण अलगुले यांनी फुलारी साहेब मी तुमच्या दालनात बसलोय मला न्याय द्या अशी प्रतिक्रिया बुलंद पोलीस टाइम्सशी बोलतांना दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here