नाशिक (विशेष प्रतिनिधी इंजि. कुबेर जाधव) : गुरुवारी उमराणा बाजार समितीत उन्हाळ कांद्याची प्रंचड आवक झाली. उमराणे बाजार समितीच्या दोन्ही बाजार समितीत सकाळच्या सत्रांत उन्हाळ कांद्याची प्रंचड आवक झाल्याने तिन हजारांवर वाहनाची रेलचेल झाल्याने बाजारात कांद्याचे दर एक दम सातशे ते एक हजार रुपयांनी घसरले.
दुपारच्या सत्रातील बाजार भावात थोडी सुधारणा झाली होती, १०/११ दिवस बाजार समितीचे कामकाज बंद राहिल्याने आवक तुंबली. गुरुवारी स्वर्गीय ज्ञानदेवदादा देवरे बाजार समितीच्या आवारात एकुण १५७७ वाहनांची विक्रमी आवड झाल्याने, कांद्याचे भाव सातशे ते आठशे रुपयांनी घसरले. तिच परिस्थिती फुलेनगर खारीफाटा येथील खाजगी बाजार समितीत होती.
फुलेनगर बाजार समितीत १२२४ वाहनांची आवक झाल्याने, कांदा भावात मोठी घसरण झाली. उन्हाळ कांद्याचे कमीतकमी ७५० ते जास्तीत जास्त २६०० रुपयांप्रमाणे सरासरी १७०० ते १८०० रुपये पर्यंत भाव होते. देवळा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात एकूण ३८० वाहनांची आवक झाल्याने तिन्ही बाजारसमितीत मिळून ३१८० वाहनांची विक्रमी आवक झाली. यामुळे व्यापाऱ्यांचेही धाबे दणाणले होते.
त्यामुळे सद्यपरिस्थितीत बाजार समितीत वाहने उभी करायलादेखील जागा उपलब्ध नाही. नोव्हेंबरपर्यंत उन्हाळ कांद्याची मागणी राहील, त्यानंतर ती कमी होईल हे जरी खरे असले तरी, लाल कांद्याची आवक अजून खूपच कमी आहे. गुरुवारी सकाळी लाल कांद्याची आवक केवळ ४८ छोटी मोठी वाहने होती. पुढे महिनाभर बाजारसमितीत अशीच आवक राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारात एकदम गर्दी न करता चाळीत साठवलेला कांदा थोडाथोडा बाजारात आणणे गरजेचे आहे, असे मत कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संपर्क प्रमुख कुबेर जाधव यांनी व्यक्त केले आहे.
Home उत्तर महाराष्ट्र नाशिक उन्हाळ कांद्याची आवक वाढल्याने कांद्याचे भाव घसरले; बाजार समित्या झाल्या तुडुंब






