नक्षलवाद्याचा मोठा नेता मिलिंद तेलतुंबडे पोलिस चकमकीत ठार

गडचिरोली (प्रतिनिधी) : शनिवारी (दि. १३) सकाळी कोरची तालुक्यातील गॅरापत्ती पोलिस मदत केंद्रांतर्गत बोटेझरी-मरदिनटोला परिसरातील जंगलात पोलिस-नक्षल चकमक झाली. यात २६ नक्षलवादी ठार झाले असून, ३ पोलिस किरकोळ जखमी झाले आहेत. या चकमकीत नक्षलवाद्याचा देशातील सर्वात मोठा नेता मिलिंद तेलतुंबडे ठार झाल्याची माहिती समोर येत आहे.

नक्षलवाद्याच्या मोठ्या कंमाडर पैकी एक म्हणून मिलिंद तेलतुंबडे याची ओळख आहे. त्याच्यावर ५० लाखांच बक्षीस लावलं गेलं होत. यासह दंडकारण्यातील आणखी एक मोठा नेता जोगन्ना हा देखिल या चकमकीत ठार झाल्याचे सांगितले जात आहे. पण याबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती अद्याप आलेली नाही.

आज पहाटे सी-६० पथक व केंद्रीय राखीव दलाचे जवान संयुक्तपणे छत्तीसगड सीमावर्ती भागातील बोटेझरी जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना साडेपाच वाजताच्या सुमारास नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनीही जोरदार प्रत्युतर दिले. त्यानंतर नक्षलवादी घटनास्थळावरुन पसार झाले. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नक्षल्यांचे पिट्टू, शस्त्रे व अन्य साहित्य सापडले आहे. २६ नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले आहेत, शिवाय ३ पोलिस किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना हेलिकॉप्टरने नागपूरला पाठविण्यात आले आहे, या चकमकीत नक्षवाद्यांचा मोठा नेता मिलिंद तेलतुंबडे ठार झाल्याची माहिती समोर येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here