पुण्यात १७ वर्षीय मुलाचा १५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला हॉटेलवर घेऊन जात तिच्यावर वारंवार बलात्कार केला असल्याचा प्रकार समोर आला आहे.

या मुलीने नकार दिल्यानंतर तिला शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी देण्यात आली. दरम्यान मुलीच्या आईला हा प्रकार समजल्यानंतर तिने पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा संपूर्ण प्रकार मे ते ऑक्टोबर या कालावधीत घडला.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की फिर्यादी यांना पंधरा वर्षांची मुलगी आहे. सतरा वर्षाच्या मुलाने तिला मे महिन्यात लोहगाव येथील हॉटेलमध्ये नेत तिच्यावर वारंवार बलात्कार केला. या सर्व प्रकाराला विरोध केला असता शिवीगाळ करून तिला ठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here