कार्ला परिसरातील बंगल्यावर लोणावळा ग्रामीण पोलिसांची कारवाई; १७ जणांवर गुन्हा दाखल

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : कार्ला गावचे हद्दीमधील एमटीडीसी शेजारी एका बंगल्यावर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत ९ पुरुष व ८ महिलांवर गुन्हा दाखल केला आहे.तसेच त्यांच्याजवळील वाहने, फोन असा सुमारे ७४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी ही माहिती दिली.

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्लागावचे हद्दीमध्ये एम.टी.डी.सी. जवळ, दुर्गा सोसायटीमधील तन्वी बंगल्यामध्ये ९ पुरुष व ८ महिला असे स्पीकरवर गाणे लावून त्यावर अश्लील हावभाव करून नाचत आहेत अशी माहिती मिळाली. त्यानंतर लोणावळा उपविभागीय अधिकारी राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या पथकाने दोन पंचाच्या उपस्थितीमध्ये छापा टाकून सदर ठिकाणाहून ९ पुरुष व ८ महिलांना ताब्यात घेत अटक कारवाई केली.

खाजगी बंगल्यामध्ये विनापरवाना सदरचे गैरकृत्य करताना ऋषिकेश संजय पठारे, अमित कृष्णा मोरे, योगेश संदेश काशिद, विकास रामचंद्र पारगे, कैलास मारुती पठारे, स्वप्नील जगदीश तापकीर, विनोद रमेश डख, प्रसाद बाळासाहेब विर, नागेश कुंडलीक थोरवे (सर्व राहणार चर्‍होली व भोसरी परिसर) यांच्यासह ८ महिला यांना ताब्यात घेतले. सदर ठिकाणाहून रोख रक्कम, मोबाईल फोन, चारचाकी ५ वाहने, स्पीकर असा एकूण किं. रु. ७४ लाख २७ हजार ६३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, पोलीस उप अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रविण मोरे, पोलीस उपनिरीक्षक सचिन बनकर, सहा फौजदार युवराज बनसोडे, पो. हवा. खान, शेख, पो. ना. पवार, पो. ना. कदम, पो. कॉ. बोराडे, म. पो. ना. कोहिनकर, चालक पो. ना. प्रणयकुमार उकिर्डे यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here