स्पॅरोताई फाउंडेशनच्यावतीने पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली जन्मदिवस साजरा

ठाणे (प्रतिनिधी सुभाष जैन) : शहरीकरणामुळे पक्ष्यांचा अधिवास धोक्यात आला आहे. पक्षी वाचवा ही जनजागृती लहान मुलांमध्ये नव्हे तर मोठ्या माणसांमध्ये निर्माण करणे आवश्यक आहे त्यांचे अनुकरण लहान मुले नक्की करतील” असे प्रतिपादन परिक्षेत्र वनअधिकारी येऊरचे गणेश सोनटक्के यांनी केले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि स्पॅरोताई फाउंडेशन महाराष्ट्र यांचे वतीने आयोजित पक्षी सप्ताहाचे निमित्याने पक्षी तज्ज्ञ डॉ सलीम अली यांच्या जन्मदिनाच्या कार्यक्रमात गणेश सोनटक्के बोलत होते.

स्पॅरोताई फाउंडेशनचे समन्वयक डॉ. योगेश जोशी यांनी पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली आणि मारुती चितमपल्ली यांच्या आठवणी जागवून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर स्पॅरोताई फाउंडेशनचे पदाधिकारी डॉ. प्रकाश माळी यांनी स्पॅरोताई फाउंडेशनच्या पर्यावरण विषयक उपक्रमांचा आढवा घेतला. या प्रसंगी स्पॅरोताई फाउंडेशनचे सदस्य राजेंद्र गोसावी , सुभाष जैन, रुची पारकर, सुवर्णा कांबळी, धनश्री कुरूप यांनी चिऊताईच्या कविता सादर केल्या. स्पॅरोताई फाउंडेशनच्या पर्यावरण आणि पक्षी बचाव जनजागृती उपक्रमासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली यांचे वतीने संस्थेस पक्षी स्नेही पुरस्कार-२०२१ प्रदान करण्यात आला.

sparowtai-foundation

सदर कार्यक्रमास परिमंडळ वनअधिकारी येऊर् विकास कदम , परिमंडळ वनअधिकारी नागपाडा रमाकांत मोरे , परिमंडळ वन अधिकारी घोडबंदर मनोज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. परिमंडळ वनअधिकारी चेणाचे सुजय कोळी यांनी प्रास्ताविक केले तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. योगेश जोशी यांनी करून कार्यक्रमात रंगत भरली.

उपस्थित मान्यवरांना स्पॅरोताई फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. ज्योती परब व सचिव डॉ. राज परब यांच्या वतीने चिमण्यांची घरटी भेट देण्यात आली. उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणारे राजन खरात , विनोद ठाकूर , अविनाश वानखेडे , आरती तवटे यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले, अशी माहिती सचिव डॉ.राज परब यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here