दिल्ली पोलिसांनी पकडले परदेशी सेक्स रॅकेट; टुरिस्ट व्हिसावर मुली आणून चालायचा वेश्याव्यवसाय

sex-racket

दिल्ली (उपसंपादक जीवन षाकया) : टुरिस्ट व्हिसावर भारतात आलेल्या उझबेकिस्तानच्या दोन तरुणी दिल्लीत सेक्स रॅकेट चालवत होत्या. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने जहांगीर पुरी येथील पूरण सिंग (वय ४७) या कॅब ड्रायव्हरला, महिपालपूरमध्ये राहणाऱ्या २४ आणि २८ वर्षांच्या दोन तरुणींसह अटक केली आहे. या तरुणी एका रात्रीसाठी २० हजार रुपये घेत असत, तर कॅब ड्रायव्हरला कमिशन म्हणून दोन हजार रुपये मिळत असत.

डीसीपी (गुन्हे) मोनिका भारद्वाज यांनी सांगितले की, एएसआय बलराज यांना काही परदेशी लोक सेक्स रॅकेट चालवत असल्याची खबर मिळाली होती. चौकशी केली असता मोनू नावाचा एजंट वेश्याव्यवसायासाठी परदेशी मुलींचा पुरवठा करत असल्याचे आढळून आले.

३-४ परदेशी तरुणींच्या पुरवठ्यासाठी या एजंटशी संपर्क साधला असता, एका रात्रीसाठी २० ते २५ हजार रुपये घेतात, असे त्याने सांगितले. अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटची टीम तयार करण्यात आली. करारानुसार, उझबेकिस्तान वंशाच्या दोन मुली बँक ऑफ बडोदा, सेक्टर-१५, रोहिणीजवळ एका कॅबमध्ये आल्या. दोघींनी एका रात्रीसाठी २० हजार रुपयांची मागणी केली. पोलिसांच्या पथकाने दोन्ही तरुणींना पकडले.

कॅब चालकाने कमिशन म्हणून २ हजार रुपये घेतले होते, तोही पकडला गेला. गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केल्यानंतर तिघांनाही अटक करण्यात आली. चौकशीत दोन्ही परदेशी तरुणींनी सांगितले की, त्या टुरिस्ट व्हिसावर भारतात आल्या होत्या आणि बराच काळ येथे राहिल्या होत्या. आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सहज पैसे मिळवण्यासाठी त्या या व्यवसायात अडकल्या.

चार-पाच महिन्यांपासून परदेशी मुलींचा पुरवठा करणाऱ्या रमेशच्या संपर्कात आल्याचे कॅब ड्रायव्हर पूरणने सांगितले, तो मुलींना ग्राहकापर्यंत सोडत असे. दोन्ही मुली एका उझबेक नागरिकाच्या माध्यमातून रमेशच्या संपर्कात आल्या होत्या. या संपूर्ण साखळीला पकडण्यासाठी पोलीस तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here