नवी दिल्ली । मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात असलेल्या बागेश्वर धामच्या परिसरातून एका धक्कादायक बातमी समोर आली आहे. या ठिकाणी शिवपुरी जिल्ह्यातील रज्जन खान याला अवैध रिव्हॉल्व्हरसह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
बागेश्वर धामच्या मंदिराच्या आत परिक्रमा रस्त्यावर फिरणाऱ्या भाविकांनी एका व्यक्तीला रिव्हॉल्व्हर घेऊन जाताना पहिले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला अटक केली आहे. रज्जन खान याच्याकडून पोलिसांनी ३१५ बोअरचे रिव्हॉल्व्हर आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहे.
दोन दिवसांपूर्वी १८ जून रोजीही बागेश्वर धाम परिसरातून एका आरोपीला अटक करण्यात आली होती. त्याच्याकडूनही रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आली होती.तर आता ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीवर यापूर्वीही गुन्ह्यांची नोंद आहे. दरम्यान या प्रकरणात आरोपीविरुद्ध कलम २५/२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







