सम्राट कॉलनीत ‘एक कॅमेरा पोलिसांसाठी’ सीसीटीव्ही लोकार्पण सोहळा संपन्न

cctv-lokarpan

जळगाव (क्राइम रिपोर्टर शाहीद खान) । शहरात आज दिनांक २१ जुन रोजी सायंकाळी ५:३० वाजता सम्राट कॉलनी वडेश्वर महादेव मंदिर येथे सम्राट कॉलनी, मासूम वाडी, कासमवाडी परिसरात १२ कॅमेरे बसविले त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

 

लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम बी जे शेखर पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली व एम राजकुमार पोलीस अधीक्षक जळगाव, तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री.चोपडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी पोलीस उपअधीक्षक संदीप गावित तसेच पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील, पोलीस निरीक्षक शेळके, पोलीस निरीक्षक श्री आव्हाड तसेच परी पोलीस उप अधीक्षक आप्पासाहेब पवार तसेच नगरसेवक कुंदन काळे, रहीस बागवान, सामाजिक कार्यकर्ते गनी पिंटू परदेशी जाकीर अब्दुल सत्तार मेमन,इमाम जावेद अख्तर असे एकूण ६० ते ७० प्रतिष्ठित नागरिक हजर होते.

 

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ए एस आय अतुल वंजारी, सचिन घुगे मिडिया, हवालदार प्रदीप पाटील, गोपनीय विभागाचे विश्वास बोरसे, पोलीस हवलदार दीपक चौधरी, मंदार पाटील यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here