भडगाव साई ऑटो सेंटर मध्ये ३० दुचाकीसह चोरी : कर्मचारीच निघाला आरोपी

bhadgaon-bike-thief

जळगाव (क्राइम रिपोर्टर शाहीद खान) । शहरात स्थानिक गुन्हे शाखेने आज दि. १४ रोजी बुधवारी तब्बल २६ दुचाकीसह चोरट्याला आज ताब्यात घेतले आहे.

 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव रोड भडगाव येथील एका साई ॲटो बजाज शोरुम मधील तब्बल ३० दुचाकी चोरीस गेल्याची घटना घडली होती.या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

 

jalgaon-policeत्यानंतर या गुन्ह्याच तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे आल्याने पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहायक पोलीस अधीक्षक अमरसिंग देशमुख यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना गुप्त बातमी मिळाली त्यांनी लागलीच आपले पथक जावुन साई ॲटो बजाज शोरूमचे मालक यांना त्यांचे कडील स्टॉक बाबत विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे स्टॉप मधून १४ पल्सर मोटरसायकल व १३ प्लेटिना मोटरसायकल असे एकूण ३० मोटरसायकल २२,७७,९८०/-रु किंमतीच्या कमी असल्या बाबत कळविले त्याच्यावर वरील पथकाने शोरुम मधील स्टॉप यांचे विचारपूस करून संशयित शौएब खान रऊफ खान रा. नगरदेवळा ता. पाचोरा यास विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्याने सदर शोरुम मधुन साधारण तीन महिन्यापासून वेळोवळी जशी संधी मिळेल असे १-१ मोटरसायकल बाहेर काढून इतरांना कमी पैशात विकत होता. त्यास अजून विश्वासात घेऊन त्याने ज्या व्यक्तींना विकलेल्या आहेत अश्या व्यक्तींना निष्पन्न करीत आहोत. त्यांच्याकडून ११ पल्सर मोटरसायकल व १५ प्लेटिना मोटरसायकल असे एकूण २६ मोटरसायकल १९,५८,१३९/-रु किंमतीच्या मोटरसायकल ताब्यात घेण्यात आले आहेत. तसेच सदर गुन्हा च्या पुढील तपासकामी भडगाव पोलीस स्टेशन गु.र.नं. १७१/ २०२३ भा.द.वि कलम ३८० या गुन्ह्यात आरोपी व मोटरसायकल हे पुढील तपासकामी देण्यात आले आहे.

 

 

स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील, उपनिरीक्षक गणेश वाघमारे, पोहे विजयसिंह पाटील, सुधाकर अंभोरे, महेश महाजन, अक्रम शेख, संदीप सावळे, जयंत चौधरी, विजय पाटील, राहुल पाटील प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, नंदलाल पाटील, ईश्वर पाटील, प्रमोद ठाकूर, मोतीलाल चौधरी, अनिल जाधव, नितीन बावीसकर, श्रीकृष्ण देशमुख, हेमंत पाटील, राहुरी बैसाणे, महेश पाटील, अश्यांचे पथक तयार करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here