पालघर (जिल्हा क्राइम रिपोर्टर रामदास पाटील) । पोलीस व नागरिकांमधील दुवा म्हणून कार्य करणाऱ्या साप्ताहिक बुलंद पोलीस टाइम्सच्या आढावा दौऱ्यादरम्यान बुलंद पोलीस टाइम्सचे मुख्य संपादक सुनिल पाटील यांनी पालघर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.पंकज पवार – पाटील यांची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी बुलंद पोलीस टाइम्सच्या कार्याविषयी डॉ.पंकज पवार यांना माहिती देण्यात आली तसेच बुलंद पोलीस टाइम्सचा अंकदेखील त्यांना भेट म्हणून देण्यात आला.
या सदिच्छा भेटीच्यावेळी मुख्य संपादक सुनिल पाटील यांच्यासोबत बुलंद पोलीस टाइम्सचे कार्यकारी संपादक समाधान पाटील हे होते.







