G20 परिषदेतील परदेशी पाहुण्यांचा सत्कार केला रायगडातील महिला प्रगतीशील शेतकऱ्यांनी

raigad-lady-farmer

नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी जयपाल पाटील) : G20 शिखर परिषद नवी दिल्ली येथे दि.९ सप्टेंबर रोजी पौष्टिक तृण धान्य प्रदर्शनामध्ये जगभरातील अनेक महत्वाच्या देशांच्या पंतप्रधान व अध्यक्ष यांच्या पत्नीनी भेट दिली. प्रदर्शनामध्ये देशभरातील अनेक राज्यातून तृण धान्य लागवड करणारे शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी, अधिकारी,कृषि व संलग्न विषयाची विद्यापीठे व संस्था यांच्या लक्षणीय सहभाग होता. यावेळी परदेशी पाहुण्यांचे सत्काराची संधी महाराष्ट्रातील महिला प्रगतिशील शेतकऱ्यांना प्राप्त झाली.

 

raigad-lady-farmer-welcome-deligates-of-g20तृण धान्य उत्पादक मध्यप्रदेशमधील मांडला जिल्ह्यातील लहरिबाई यांनी तृण धान्याच्या १५० हुन अधिक जाती जतन केले आहेत.हा सर्वांचा कौतुकाचा विषय होते. यावेळी जगभरातुन पंतप्रधान व राष्ट्रपती यांच्या पत्नी यांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदवला. यावेळी यांचे सत्कार करण्याचे मान महाराष्ट्र राज्याला मिळाले.तो मान सौ.अनिता योगेश माळगे यांनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी, इटली प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी याचे सत्कार, सौ.अनिता माळगे व साऊथ कोरिया पंतप्रधान यांची पत्नी युन सिक व ओयोल व इमाणुल,फ्रान्स पंतप्रधानची पत्नी यांचे सत्कार रायगड जिल्ह्यातील भारती कातकरी यांनी केले.

 

केंद्रीय मसाला पिके संशोधन संस्था,राष्ट्रीय दूध विकास संस्था कर्नाटक,राष्ट्रीय पुष्प उत्पादन संस्था पुणे व भारतीय कृषि अनुसंधान संस्था दिल्ली अशा राष्ट्रीय पातळीवरील संस्था व त्यांचे संशोधन मांडणी केले होते.ड्रोन, हायड्रोपोनिक व महाराष्ट्र व कर्नाटक मधून शेतकरी कंपनीने मिलेट व मिलेट पासून बनवलेले पदार्थ यांची मांडणी केली होती.महाराष्ट्र राज्यातून रणरागिणीना G20 शिखर परिषदमध्ये निवड व सहभागी होण्यापर्यंत अनुप कुमार (अपर मुख्य सचिव कृषी), सुनील चव्हाण(आयुक्त कृषी), विकास पाटील (संचालक निविष्ठा व गुणनियंत्रक) , दशरथ तांभाले (संचालक आत्मा), रफिक नाईकवाडी (विभागीय कृषी सहसंचालक पुणे), माननीय जिल्हाधिकारी रायगड योगेश म्हसे, दत्तात्रय गावसाने (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोलापूर), सौ.उज्वला बाणखेले (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रायगड), मदन मुकणे (आत्मा प्रकल्प अधिकारी,सोलापूर), लालासाहेब तांबडे (वरिष्ठ शास्त्रज्ञ केविके, सोलापूर), नितीन शेळके (नाबार्ड डीडीएमसोलापूर ) व सौ प्रज्ञा पाटील (बीटीएम रायगड) यांनी सर्वतोपरी सहकार्य अणि मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here