सातारा येथे सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टमुळे दोन गटात राडा

satara-in-fire

सातारा (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील पुसेसावळी येथे दोन गटात झालेल्या हिंसक वादानंतर परिसरात त्याचे तीव्र पडसाद उमटले आहे. महापुरुषांबाबत सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर प्रसारीत केल्यावरुन हा वाद सुरू झाला होता. दरम्यान एका विशिष्ठ समुदायास या मुळे लक्ष्य करण्यात आले आहे. परिसरात जाळपोळ आणि दगडफेक झाली असून, यात एक युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

तणावाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात तणाव असून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले असून खबरदारी म्हणून सर्व इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान रात्री विशिष्ट समाजाची घरे, दुकाने, हातगाडे, वाहने लक्ष्य करत दगडफेक झाली आहे. याचदरम्यान हिंस्त्र जमावाने घरे, दुकाने यांना आग लावण्यास सुरुवात केली. २ ते ३ हजार युवकांचा जमाव जमा झाला होता.

१० सप्टेंबर रोजी पुसेसावळी येथे एका व्यक्तीने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. सदर पोस्टवरुन रात्री उशीरा युवकांच्या मध्ये दंगल उसळली. या दंगलीत व जाळपोळीत २ दुकाने आणि २ घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. प्रार्थना स्थळाची नासधूसही करण्यात आली आहे. या घटनेनंतर पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्यासह २ डीवायएसपी फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले आहेत. वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या २ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here