पालकमंत्र्यांच्या सहकार्याने धरणगावचा पाण्याच्या प्रश्‍न कायम स्वरूपी दूर होणार – माजी नगराध्यक्ष पी एम पाटील

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) : जिल्ह्यातील धरणगाव येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न हा अनेक वर्षांपासूनचा असून धरणगाव करांची अनेक वर्षा पासून शुद्ध पाणी मिळावे ही अगोदर मागणी होती तो प्रश्‍न अनेक वर्षां पासून प्रलंबित होता जेते नगराध्यक्ष राजकीय पक्षाचे न.पा वर सत्तेत होते सर्वांनी तो सुधारण्यासाठी प्रयत्न केलेत परंतु त्याला यश आले नाही गुलाबराव पाटील हे राज्य मंत्री असताना व नगराध्यक्ष पी एम पाटील असताना २०१५ मधे खऱ्या अर्थाने ते पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर असतांना गुलाबराव पाटील साहेबांनी मुंबई येथे अधिवेशनात हा प्रश्न त्यांच्याकडून मंजूर करून घेतला व पाणीपुरवठा सचिव सौ.म्हैसकर मॅडम यांच्या अध्यक्ष ते खाली झालेल्या मंत्रालयाच्या बैठकीत या विषयांवर त्यावेळेस पालकमंत्री गुलाबराव पाटील सौ.म्हैसकर मॅडमला सांगून माझ्या मतदार संघाच्या विषय असून अनेक वर्षांपासून नागरिक अशुद्ध पाणी पीत आहे आपण तो प्रश्‍न मार्गी लावावा.

धरणगाव मुख्यधिकारी सौ सपना वसावा,नगराध्यक्ष पी एम पाटील सर व पाणीपुरवठा चे सर्व अधिकारी यांच्या उपस्थितीत मुंबई येथे धरणगावी नागरिक असे अशुद्ध पाणी पितात व त्यांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी संपूर्ण डेमो डी पी तयार करून तेथे दाखवण्यात आला तेव्हा त्या वेळेस 4 कोटी 30 लाख रुपये धरणगाव जल शुद्ध करण्यासाठी मंजूर झाले. त्यावेळेस मी हे अनेकदा भाषणात सांगितले होते नगराध्यक्ष असताना जलशुद्धीकरण केंद्र सुरू झाले तरी पाणी हे वेळेवर मिळणार नाही जुनी पाईप लाईन त्यातल्या त्यात झोन,सब झोन,तांत्रिक अडचणी,पाईप लाईन फुटणे,लाईट चा प्रश्‍न अश्या अनेक समस्येमुळे १० ते १२ दिवस लागणारच पाणी देण्याची वेळ कमी केली तर ३ ते ४ दिवस कमी होतील परंतु शेवटच्या टोकापर्यंतच्या लोकांना नळाला पाणी येऊन सुद्धा मिळत नव्हते त्यामुळे तसा प्रयत्न देखील केले गेले होते. जो पर्यंत संपूर्ण गांवाची पाईप लाईन बदलली जात नाही पुन्हा नवीन दोन टाक्या बांधल्या जात नाही तो पर्यंत एक दोन दिवस आड किंवा दररोज आपण पाणी देऊ शकत नाही. हे आम्ही नागरिकांना कितीही समजून सांगितले तरी ऐकायची भूमिका कोणाची राहत नाही.

त्यातल्या त्यात विरोधकांचे म्हणणे होते की पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील असतांना धरणगाव पाणी वेळेवर मिळत नाही पाणीपुरवठा मंत्री असून काय उपयोग परंतु आम्ही सर्व पदाधिकारी नगरसेवक सांगत असतो हे काम पालकमंत्र्यांचे नाही ही जबाबदारी प्रशासन,नगराध्यक्ष व नगरसेवकांची आहे.त्यात पालक मंत्राचा काय संबंध अनेक तांत्रिक अडचणी मुळे वेळेवर पाणी कोणीच देऊ शकत नाही स्वतः गुलाबराव वाघ यांनी नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांना सांगितले पाण्याचे नियोजन करा नागरिकांना समजून सांगा पाण्याची वेळ कमी केली तर ते पाणी आठ ते दहा दिवसात काही वेळेस पंधरा दिवसात दिले जाते आहे ते पाच ते सहा दिवसा दिले जाईल पाईप लाईन नेहमीत नेहमीत कशी फुटली स्वता नगरसेवकांच्या तेवढ्या परिसरात ड्यूटया लावा चुका तुम्ही करा आणि नाव पालकमंत्र्यांचे बदनाम होते सर्व नगरसेवकांना खडे बोल सुनावले त्यानंतर उपनगराध्यक्ष विलास महाजन पाणीपुरवठा सभापती यांच्यावर जबाबदारी सोपवून नियोजन करा असे आदेश दिलेत.

दोन महिन्यां पासून पाईप लाईन सुद्धा फुटत नाही आणि पाणी सुद्धा चार ते पाच दिवसाआड येत आहे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी पालकमंत्र्यांच्या मागे लागून भाऊ काही करा धरणगावच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी पण सुटायला पाहिजे त्यासाठी संपूर्ण पाईप लाईन बदलली पाहिजे भाऊंनी मंत्रालयात एकनाथराव शिंदे साहेब यांच्या सहकार्याने धरणगावच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यासाठी प्रयत्न केले आणि 27 कोटी 44 लाख रुपये मंजूर केले आता धरणगाव वासियांना निहमीत किंवा एक दिवसाआड पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून खास करून गटनेते पप्पू भावे यांना ह्या कामासाठी पाठपुरावा केला. एक महिन्यांपासून कामावर लागले होते.

कोणतेही काम अधिकारी पाठपुरावा केल्याशिवाय लवकर मार्गी लावत नाहीत.जलशुद्धीकरण मंजुरी च्या केलेस पी एम पाटील सर एक महिन्या पासून मंजुरी दिल्याच्या सुद्धा आदेश मिळत नव्हते नागपूर अधिवेशनातून जलशुद्धीकरण चे आदेश त्यावेळेस ही गुलाबराव पाटील साहेब यांच्या सहकार्याने अधिकृत पत्र न.पा.ला.मिळाले होते. नागरिकांनी सुद्धा न.पा प्रशासनाला व नगरसेवकांना समजून घेऊन सहकार्य करावे

न.पा. निवडणुका येत आहेत त्यामुळे पाणी 5ते6 दिवसात येत आहे. निवडणुका झाल्या की पुन्हा तशीच परिस्थिती होईल असे विरोधक चर्चा करीत असतात पाण्याची पाईप लाईन टाकायची होती तर पेव्हर व रस्ते करण्याचे काय काम होते परंतु रस्त्याचे कोणतेही नुकसान होणार नाही आणि पाईप लाईन सुद्धा टाकली जाईल नियोजन त्याच पद्धतीने केले गेले आहे हे आपल्याला काम सुरु झाल्यावर दिसेलच आणि हे काम सुद्धा लवकरात लवकर कामाचा सुद्धा प्रयत्न पालकमंत्री गुलाबराव पाटील व गुलाबराव वाघ यांनी नियोजन केले आहे त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here