किरकोळ कारणावरून झालेल्या वादात तरुणाला चाकूने भोसकले

लातूर (प्रतिनिधी) : धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरुन झालेल्या वादात राग आल्याने एका तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना येथील कव्हा नाका परिसरात घडली. याबाबत विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी अविनाश गंगाराम राठाेड (१८ रा. माताजी नगर, लातूर) हे कव्हा नाका परिसरातील एका टपरीवर सुपारी खाण्यासाठी शुक्रवारी गेले हाेते. दरम्यान, साेपान केरबा बाेयणे (रा. माताजी नगर, लातूर) हा पाठीमागून तेथे आला. फिर्यादीला धक्का दिला असता, फिर्यादीने मला धक्का का दिला? अशी विचारणा केली असता, तू लय भारी गेलास काय असे म्हणून शिवीगाळ केली. यावेळी तुला खल्लास करताे असे म्हणत पॅटच्या खिशातील बटनचा चाकू काढून फिर्यादीला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या पाेटावर, उजव्या बरगाडीच्या खाली, बेंबीच्या बाजूस चाकूने वार करुन गंभीर जखमी केले. शिवाय, पाेटात चाकू भाेसकून पळून गेला.

याबाबत विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्यात देण्यात आलेल्या जबाबावरुन साेपान बाेयणे याच्याविराेधात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस उपनिरीक्षक खंदारे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here