हॉटेलमध्ये सुरु असलेल्या मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; ११ तरुण तरुणींना अटक

इंदूर (मध्यप्रदेश) : शहरात एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. येथे पोलिसांनी ११ तरुण आणि तरुणींना अटक केली आहे. सुरुवातीच्या चौकशीत वेश्याव्यवसायात गुंतलेल्या देहविक्री करणाऱ्यांनी सांगितले की, ते गेल्या दोन-तीन महिन्यांपासून दलालांमार्फत हा धंदा करत होते.

सेक्स रॅकेटशी संबंधित हे प्रकरण इंदूरच्या उच्चभ्रू विजय नगर भागातील आहे. विजय नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या शीतल नगरमध्ये असलेले हॉटेल लव्ह हे वेश्याव्यवसायाचे अड्डे बनले होते. येथे इंदूरचे २ दलाल बाहेरून आणलेल्या ५ मुली पुरवायचे. शुक्रवारी रात्री इंदूरचे विजय नगर पोलीस परिसरातील हॉटेल्सची अचानक तपासणी करत होते. तपासादरम्यान हॉटेल लव्हमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर विजय नगर पोलिसांच्या महिला उपनिरीक्षक प्रियांका शर्मा यांच्या पथकाने छापा टाकला. यावेळी हॉटेलमध्ये ५ मुली आणि ६ तरुण उपस्थित होते, त्यांना पोलिसांनी अटक केली.

विजय नगर पोलिस स्टेशनचे प्रभारी तहजीब काझी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी वेश्याव्यवसायात सहभागी असलेल्या सर्व आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. या संपूर्ण प्रकरणात हॉटेल मालकालाही आरोपी करण्यात आले आहे. सध्या वेश्याव्यवसायात गुंतलेल्या सर्व ११ आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here