अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा आले पुन्हा अडचणीत; वांद्रे पोलिसात गुन्हा दाखल

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. मुंबईतील वांद्रे पोलिसांनी अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

मुंबईतील वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये नितीन बरई नावाच्या व्यक्तीने अभिनेत्री शिल्पा शेट्टी, तिचा पती राज कुंद्रा, काशिफ खान यांच्यासह काही लोकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण २०१४ चं असून तक्रारीनुसार, १ कोटी ५९ लाख रुपयांची केले फसवणूक केल्याचे तक्रारदाराने म्हटलं.

वांद्रे पोलिसांनी कलम ४०६, ४०९, ४२०, ५०६, ३४ आणि १२० (बी) कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. पैशांच्या फसवणुकीप्रकरणी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांची कसून चौकशी होऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here