जळगाव ( क्राइम रिपोर्टर शाहिद खान) : शहरातील ईच्छा देवी पोलिस चौकीसमोरील गणपती नगरातील सेवानिवृत्त बैंक कर्मचा-याचे बंद घर फोडुन चोरट्यांने पलंग, गैस सिलेंडर, इनव्हर्टर आदी साहित्य चोरुन नेले. रामानंदनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हाची नोंद केली आहे.
गणपती नगरात सेवानिवृत्त बैंक कर्मचारी सुमंगल कैशव वाणी (वय ७७) वास्तव्यास आहेत. मार्च महीन्यापासून ते मुलांकडे गेले असतांना घर बंद होते.अज्ञात चोरट्यांनी घराच्या कंपाउंडचे लोंखडी गेट आणि मुख्य दरवाजाचे कुलुप तोडुन आत प्रवेश केला.
यावेळी चोरट्यांनी घरातील २ गैस सिलेंडर, २ शिलाई मशीन, इनवर्टर मशीन,यांसह घरातील इलेक्ट्रॉनिक फिटिंगच्या वायर्स चोरट्यांनी उखडुन चोरल्याचे समोर आले. सुमंगल वाणी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन रामानंद नगर पोलिसांत गुन्हाची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो.ना संजय सपकाळे करत आहे.







