नाशिक (विशेष प्रतिनिधी इंजि कुबेर जाधव) : धाराशिव संचलित वसाका चे कार्यकारी संचालक अमर पाटील यांच्या ३४ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने कारखाना कार्यस्थळावर २४ तास नियमित पणे प्राणवायूचा पुरवठा करणारे , वड पिंपळ,चिंच,निंब,आंबा वृक्ष लागवड करून साजरा करण्यात आला,
यावेळी अमर पाटील यांनी स्वतः वृक्ष लागवड करून आपला वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करून, समाजासमोर एक आदर्श निर्माण केला ,” झाडे जगवा झाडे लावा “असा संदेश देत प्रत्येक व्यक्ती ने वर्षाभरात किमान पाच मोठी झाडं लावुन त्यांच संगोपन केले पाहिजे असे सांगितले , याप्रसंगी कारखान्याचे जेष्ट संचालक संजय खरात , संदीप खारे , जनरल मॅनेजर पठाण सो,स्वप्निल आहीरे, विक्री आहीरे वसाका मजदुर युनियनचे कार्याध्यक्ष कुबेर जाधव, अध्यक्ष अशोक देवरे चिप केमिस्ट् सुर्यवंशी कोजन इन्चार्ज संतोष कचोर चिप इंजिनिअर शेलार, सुरक्षा अधिकारी किरण आहीरे योगेश गायकवाड, शेतकी अधिकारी सुधाकर सांळुखे ,भिवराज सोनवणे ,अण्णा डुबल,रुपक रनदीवे, सुरज पवार स्टोअर किपर नवलभगत , अजित मोरे , दीपक पवार मुन्ना पवार, निंबा निकम , आदींनी वाढदिवसाच्या निमित्ताने वुर्क्षा रोपन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी कारखान्याचे जनरल मॅनेजर पठाण व युनियनचे कार्याध्यक्ष कुबेर जाधव, अशोक देवरे ,दीपक पवार यांनी श्री अमर पाटील यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला ,
विशेष म्हणजे कार्यकारी संचालक अमर पाटील यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्यांचे जेष्ट बंधु धाराशिव उद्योग समूहाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे पहिले आंक्सिजन मॅन म्हणून गौरविण्यात आलेले व साखर कारखान्यात पहिला ऑक्सिजन प्रकल्प उभा करून कोरोना महामारीत शेकडो लोकांना जिवदान देउन प्राण वाचवुन समाजा समोर आदर्श निर्माण करणारे व्यक्तीमत्व अभिजित पाटील यांना ” राज्य स्तरीय कोविड योद्धा ” पुरस्कार महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ना, एकनाथ शिंदे, ना.अदीती तटकरे ,ना बच्छु कडुं, पारनेर तालुक्याचे आ निलेश लंके , डॉ तात्याराव लहाने यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे येथे शानदार समारंभात मानाचा ” कोविड योद्धा”* पुरस्कार देऊन गौरविण्यात आले , त्याबद्दल अभिजित पाटील यांचे कारखान्याचे संचालक संदीप खारे, संजयजी खंरात जनरल मॅनेजर पठाण, युनियन कार्याध्यक्ष व कोविड योद्धा, वृक्षमित्र कुबेर जाधव यांनी अभिनंदन केले आहे ,







