मीरा रोडमधून ९ बांग्लादेशींना अटक; २ महिला व १ अल्पवयीनचा समावेश

मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) : पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने मीरारोडच्या जुन्या पेट्रोल पंप जवळ धाड टाकून ९ बांगलादेशी नागरिकांना अटक केली असून त्यात २ महिला व १ अल्पवयीनचा समावेश आहे. या प्रकरणी नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

मीरा भाईंदर – वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील. यांच्या मार्गदर्शनाखाली केशव शिंदे , उमेश पाटील , रामचंद्र पाटील, सुप्रिया तिवले , सम्राट गावडे यांच्या पथकाने शनिवारी जुन्या पेट्रोल पंप , गोविंद नगर परिसरात जमलेल्या ९ बांगलादेशी नागरिकांची धरपकड केली .

गेल्या काही महिन्या पासून हे शहरात विविध ठिकाणी बेकायदेशीर रित्या राहून मजुरी आदी कामे करत होते असे पोलीस चौकशीत सकृतदर्शनी आढळले आहे . सलीम जल्लाउद्दीन शेख (वय २१), रकीब जल्लाउद्दीन शेख (वय १५), मो. आसाद, ईलादी मुल्ला (वय ५५), रुमान तानुज शेख (वय २६), जाकीर ईस्साहक्क हवलदार हुसेन (वय ५०), पारुल बिजाई दास (वय ५०), वजीर खल्लीद शेख (वय ५०), खुर्शीदा वजीर शेख (वय ३७), कालम मतलब मुल्ला (वय ५०) या बांग्लादेशींना अटक करण्यात आली असून, नया नगर पोलीस अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here