पाकिस्तानी तरुणीच्या हनी ट्रॅपमध्ये अडकला भारतीय लष्कराचा जवान

indian-solider-traped-in-honeytrap

पाटणा (बिहार) : राज्यातील दानापूरमधील हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या लष्कराच्या जवानावर खगौर पोलीस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी जवानाची रवानगी कोठडीत करण्यात आली आहे. आरोपी जवान पाकिस्तानच्या एका तरूणीला व्हॉट्सअॅपवर देशाशी संबंधित गुप्त माहिती देत होता, असा आरोप आहे. या प्रकरणात आता एटीएस आणि लष्कराच्या गुप्तचर यंत्रणा पुढील तपास करत आहेत.

बिहार एटीएसने रविवारी आयबीच्या माहितीच्या आधारे मोठी कारवाई करतानाच, लष्कराच्या जवानाला अटक केली. खगौल पोलीस आणि लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेच्या सहकार्याने तपास पथकाने या जवानाला ताब्यात घेतले. पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयच्या एका महिला एजंटला लष्कराशी संबंधित गुप्त माहिती शेअर करत असल्याचा आरोप या जवानावर आहे.

एटीएस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाकस्तानच्या रिया नामक एका महिलेने या जवानाला भारतीय नौदलात डॉक्टर म्हणून कार्यरत असल्याचे सांगून त्याला आपल्या जाळ्यात अडकवले. तिच्या जाळ्यात हा जवान अडकला. त्यानंतर या पाकिस्तानी महिलेने जवानाकडून देशाच्या सुरक्षेशी संबंधित कागदपत्रे मागितली. जवळपास दोन वर्षांपासून तो तिला ही गुप्त माहिती देत असल्याचे समोर आले आहे.

अटक केलेला जवान हा नालंदा जिल्ह्यातील रहिवासी आहे. हनीट्रॅपमध्ये अडकल्यानंतर या जवानाने पाकिस्तानी महिला एजंटला महत्वाची माहिती पुरवल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अटकेत असलेला जवान पाकिस्तानी एजंटला लष्कराशी संबंधित महत्वाची माहिती देत होता, असा आरोप आहे. चौकशीदरम्यान अटकेतील जवानाने आपल्यावरील आरोप मान्य केल्याचे सांगितले जात आहेत. एटीएसने याबाबतची माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांना दिली. या प्रकरणी आरोपी जवानाविरोधात कारवाई केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here