कंगना रनौतच्या वक्तव्याने राखी सावंतला मानसिक धक्का, थेट रुग्णालयात दाखल

rakhi-sawant-admit-in-hospital

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : अभिनेत्री कंगना रनौत अलीकडेच तिच्या ‘भिक मागून मिळालेलं स्वातंत्र्य’ या विधानामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कंगना रनौतच्या या विधानाला अनेक सेलिब्रिटींनी विरोध केला आहे. कंगना रनौतच्या या वक्तव्यावर आता राखी सावंतने प्रतिक्रिया दिली आहे.राखीने सांगितले की, तिला खूप मोठा धक्का बसला असून तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. राखी सावंतने इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती हॉस्पिटलच्या बेडवर पडली आहे. व्हिडिओमध्ये राखी सावंत म्हणते, ‘मित्रांनो, मी हॉस्पिटलमध्ये आहे. नर्स माझी तपासणी करत आहे.मी आजारी आहे, शॉकमध्ये आहे. नुकताच पद्मश्री पुरस्कार मिळालेल्या एका अभिनेत्रीने सांगितले की, आपल्याला भीक मागून स्वातंत्र्य मिळाले आहे. आम्हाला दया आली. तुम्हांला तुमच्या देशावर प्रेम नाही का? मी खूप प्रेम करते आणि तुम्हीही करत असाल. अशा लोकांना पद्मश्री पुरस्कार दिला जातो. भीक मागून तुम्हाला पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. आपल्या देशाच्या जवानांनी कारगिल जिंकले, त्यांचे बलिदान व्यर्थ आहे का? मित्रांनो, ज्या प्रकारच्या कमेंट्स केल्या जात आहेत त्यामुळे मी खूप दुःखी आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here