गुंगीचं औषध देत भोंदूबाबाकडून विवाहितेवर बलात्कार

नांदेड (प्रतिनिधी) : तुमच्यावर कोणीतरी जादूटोणा केला आहे आणि या जादूमुळेच तुमचं तुमच्या सासरच्यांसोबत पटत नाही असे सांगून विवाहितेवर भोंदूबाबाने अत्याचार केला आहे. आरोपी भोंदूबाबाने पीडित महिलेला आपल्या घरी बोलावाले. नंतर तिला पाण्यातून गुंगीचं औषध दिलं आणि तिच्यावर बलात्कार केला.



मुख्य आरोपीच्या मित्राने सुद्धा पीडितेकडे लैंगिक सुख देण्याची मागणी केली होती. अशी तक्रार पीडित महिलेनं पोलिसांत दिली आहे. तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. न्यायालयाने त्याला ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. शेख याहिया असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. तर प्रकरणातील मुख्य आरोपी अजीज बाबा फरार आहे.



याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ वर्षीय पीडितेचे आपल्या सासरी पटत नव्हतं तिचे सासरच्या लोकांसोबत वाद होत असे. आरोपीने पीडितेच्या कौटुंबीक वादाचा फायदा घेतला आणि तिच्यावर जादूटोणा झाला आहे असं सांगितलं. जादूटोणा दूर करून संसार सुरळीत केला आहे, असे सांगून अजीज बाबाने पीडित विवाहितेला आपल्या घरी बोलावले. तिला पाण्यातून गुंगीचं औषध पाजलं. तसेच आरोपीने पीडितेला विवस्त्र केले आणि तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ सुद्धा शूट केले. तिचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत बाबाने तिच्यावर अत्याचार केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here