वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चौथा वर्धापन दिन संपन्न
ठाणे (प्रतिनिधी सुभाष जैन) : कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रथम मान्यवरांच्या हस्ते पालक मंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला. ठाण्यातील डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात कोरोना योध्यांचा सत्कार पालक मंत्री एकनाथ शिंदे साहेब खासदार डाॅ.श्रीकांत शिंदेसाहेब, पद्मश्री डॉक्टर तात्या लहाने साहेब, राज्यमंत्री अदिती तटकरे, राज्य मंत्री बच्चूभाऊ कडू, ठाणे महापौर नरेश मस्के साहेब आदी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
यावेळी पर्यटन, विधी आणि न्याय विभागाच्या राज्यमंत्री अदिती तटकरे, कामगार, शिक्षण आणि सामाजिक न्याय विभागाचे राज्य मंत्री बचचू कडू, आमदार निलेश लंके, शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील, अभिनेत्री दीपाली सय्यद, डिजिटल मीडिया संघटनेचे अध्यक्ष राजा माने,ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, उपमहापौर पल्लवी कदम स्थायी समिती सभापती संजय भोईर, विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला, राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे, सभागृह नेते अशोक वैती, नगरसेवक राम रेपाळे, ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, नगरसेविका परिषा सरनाईक, उल्हासनगर शहराच्या महापौर लिलाबाई आशान, ठाणे जिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता कैलास पवार, वाहतूक विभागाचे उपायुक्त बाळासाहेब पाटील आदी मान्यवर आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्यभरातून आलेले सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉक्टर काशिनाथ घाणेकर नाट्यगृह प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. कोराणा योद्ध्यांच्या स्वागतासाठी सत्कारासाठी ठाणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.






