दोंडाईचा (संतोष कोळी) – दिनांक 10 ऑगस्ट वार सोमवार 2020 वडाळी तालुका,शहादा. जि.नंदुरबार “शहीद भटू भाऊ कुंवर” यांच्या 11 व्या पुण्यतिथीनिमित्त *मा.श्री.अनंतजी तरे साहेब(राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र कोळी समाज संघ,शिवसेना उपनेते,माजी आमदार)यांच्या मार्गदर्शनाने शहीद दिनी पुण्यतिथी निमित्ताने शहीद भटूभाऊ कुवर यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात केले व सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली.जो व्यक्ती समाज हितासाठी तुम्हा आम्हा सर्वांसाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समाज संघर्षात आपल्या प्राणाचे बलिदान दिले व ज्यांनी समाजासाठी स्व रक्ताने इतिहास रचला आणि अनंतात विलीन झालेत .त्याच सोबत समस्त कोळी समाजाच्या हृदयात विराजमान झालेत .अशा शहीदा ला वंदन करण्यास दिनांक 10 ऑगस्ट 2020 सोमवार रोजी सकाळी 9 वाजता भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नरेंद्र रामचंद्र निकुम,महाराष्ट्र कोळी समाज संघ जिल्हाध्यक्ष नंदुरबार, शानाभाऊ सोनवणे,अध्यक्ष विल्मिकलव्य सेना, डॉ.राजेंद्र सावळे, गणेश सोनवणे, वकील, नामदेव येळवे, वालखेडा, हेमंत सूर्यवंशी,शहादा, योगेश सावळे. शहादा, गणेश कुवर. सारंगखेडा, संजय सोनवणे,बामखेडा, राकेश कुवर, बामखेडा, पौलद काळू कुवर, सौ. जयवंताबाई पौलद कुवर, दशरथ पौलद कुवर, छोटूलाल पौलद कुवर, ग.भा. भावनाताई भटू कुवर, कु. मनिषाताई भटू कुवर, चि. किरण भटू कुवर आदी मान्यवर उपस्थित होते.







