​​​​​​​प्रेमविवाहामुळे संतापलेल्या बापाचा मुलीवर बलात्कार; गळा दाबून केली हत्या

भोपाळ (मध्यप्रदेश) : भोपाळमधील समसगड जंगलात एका महिलेचा तिच्या मुलासह मृतदेह सापडला होता. तपासणी दरम्यान पोलिसांनी संबंधित महिलेचा खून करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार झाला असल्याची माहिती दिली होती. तपासाअंती हा बलात्कार करणारा दुसरा-तिसरा कुणी नसून खुद्द तिचा बापच होता, असे पोलिसांनी म्हटले आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, दोन दिवसांपूर्वी समसगडच्या जंगलात एका महिलेचा आणि एका लहान मुलाचा छिन्न-विच्छिन्न अवस्थेत मृतदेह सापडला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता, हा मृतदेह सिहोर जिल्ह्यातील बिल्किसगंज येथील महिलेचा असल्याचे आणि संबंधित मृत मुलगा तिचा मुलगा असल्याचे समोर आले. यासंदर्भात, पोलिसांनी चौकशी सुरू केली असता, मृत महिलेने गेल्या वर्षापूर्वी प्रेम विवाह केल्याचे समोर आले, यामुळे तिचे कुटुंबीय संतप्त असल्याचे समजले होते.

यासंदर्भात पोलिसांनी कुटुंबीयांची चौकशी केली असता वडिलांचा संशय आला. यानंतर कसून चौकशी केल्यानंतर वडिलांनी गुन्ह्या कबूल केला. चौकशीत आरोपी वडिलांनी म्हटले आहे, की त्यांच्या मुलीने पळून जाऊन लग्न केल्याने गावातील लोक टोमणे मारत होते. तसेच ही मुलगी लग्नापासून घरी आलीच नव्हती. मात्र, या दिवाळीला ती मोठ्या मुलीसोबत घरी आली होती. यातच तिच्या ८ महिन्याच्या मुलाचा आजाराने मृत्यू झाला. या सर्व दुःखाच्या परिस्थितीत मोठ्या मुलीने तिच्या वडिलांना फोन करून याची माहिती दिली.

यानंतर तिचे वडील आपल्या मुलाला घेऊन रातीबड येथे पोहोचले आणि संबंधीत चिमुकल्याचा मृतदेह दफन करण्यासाठी ते मुलीला घेऊन समसगडच्या जंगलात गेले. येथेच त्यांचा मुलीसोबत प्रेम विवाहावरून वाद झाला. यानंतर आरोपीने मुलीवर बलात्कार केला आणि तिची हत्या केली. आरोपी बापावर आयपीसी कलम ३०२, ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here