पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : येथील शिवसेनेचे शहर उपप्रमुख बाळासाहेब मालुसरे यांचा मुलगा निखील बाळासाहेब मालुसरे (वय २८, रा. कमल स्मृती, गाडीखाना मागे, १०५३ शुक्रवार पेठ, पुणे) याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज समोर आली आहे. याबाबत केईएम हॉस्पीटलकडून खडक पोलिस ठाण्यात माहिती देण्यात आली आहे.
खडक पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्यांनी हॉस्पीटलकडे धाव घेतली आहे. निखील याने राहत्या घरी गळफास घेतला. त्यानंतर तातडीने त्यास केईएम रूग्णालयात दाखल करण्यात आले.
बाळासाहेब मालुसरे यांच्या मुलानं गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळं शहरातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून, याबाबतची अधिक माहिती घेण्यात येत असल्याचं खडक पोलिसांनी सांगितलं आहे.






