कुत्र्याच्या भुंकण्याने झोपमोड झाल्याने तरुणाने झाडल्या कुत्र्यावर गोळ्या

जबलपूर (मध्यप्रदेश) : येथे शेजारच्याच्या कुत्र्याच्या भुंकण्याच्या आवाजामुळे तरूणाची झोपमोड झाली. त्रासलेल्या तरूणाने रागाच्या भरात भुंकणाऱ्या कुत्र्यावर गोळ्या झाडल्या. यात कुत्र्याचा मृत्यू झाला आहे. विजय नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. गोळीबाराच्या आवाजाने परिसर थरारला. आजूबाजूचे लोक झोपेतून जागे झाले. त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.

जबलपूरमधील विजय नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. शेजारील तरूणाची कुत्र्याच्या भुंकण्याच्या आवाजामुळे झोपमोड झाली होती. त्यामुळे संतापलेला तरूण घराबाहेर आला आणि त्याने कुत्र्यावर गोळीबार केला. यात जखमी झालेल्या कुत्र्याचा मृत्यू झाला. शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. विजय नगर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तपास सुरू केला.

पोलिसांनी मिळालेल्या तक्रारीनंतर एका सरकारी अधिकाऱ्याच्या भावाला आणि मुलाला संशयावरून ताब्यात घेतले आहे. ज्या पिस्तुलातून गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, त्याचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे प्राणीप्रेमी नाराज आहेत. कुत्र्याची गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या आरोपींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here