आंघोळीसाठी पत्नी गेली असता, पतीने बाथरूममध्ये सोडला विद्युत प्रवाह

खरगोन (मध्यप्रदेश) : येथे इंजिनीअर पतीचे राक्षसी कृत्य उघड झाले आहे. हैवान बनलेल्या पतीने पत्नी आंघोळ करण्यासाठी गेली असता बाथरूममध्ये विद्युत प्रवाह सोडून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. यात शॉक लागल्याने महिला जखमी झाली. शेजाऱ्यांच्या मदतीने महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पतीला दुसरे लग्न करायचे असल्याने त्याने हत्येचा प्रयत्न केला, असा आरोप महिलेने केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महिला बाथरूममध्ये आंघोळ करत होती. त्याचवेळी तिच्या पतीने बाथरूमध्ये वीजेचा प्रवाह सोडून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. पीडितेनेच हा आरोप केला आहे. शॉक लागल्यानंतर महिलेने मदतीसाठी आरडाओरडा केला. आवाज ऐकून शेजारचे लोक धावून आले आणि जखमी महिलेला बाहेर काढून रुग्णालयात नेले. शेजाऱ्यांच्या प्रसंगावधनामुळे महिलेचा जीव वाचू शकला.

शहरातील बिस्टान रोडस्थित ब्रिज विहार कॉलनीत आरोपी व्यक्ती राहते. तो वीज कंपनीत ज्युनिअर इंजिनीअर म्हणून काम करतो. त्याने आपल्या पत्नीची हत्या करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप आहे. दुसरे लग्न करण्यासाठीच त्याने माझ्या हत्येचा प्रयत्न केला असा आरोप महिलेने केला आहे. शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे महिलेचा जीव वाचला. जिल्हा रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणात पोलिसांनी अद्याप संशयिताला अटक केली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेला दोन लहान मुले आहेत. तिचा पती मुकेश हा तिला दररोज मारहाण करतो. स्वयंपाक करताना त्याने मारहाण केली होती. काही वेळानंतर ती आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेली. त्याचवेळी पती मुकेशने बाथरूममध्ये वीजेचा प्रवाह सोडला. नळ सुरू केल्यानंतर तिला वीजेचा धक्का बसला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे महिला जोरजोरात ओरडू लागली. तिने मदतीसाठी धावा केला. शेजारच्या नागरिकांनी धाव घेऊन तिला बाथरूममधून बाहेर काढले आणि तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here