जळगाव जिल्ह्यात आढळले आजवरचे सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण

female lab technician doing research with a microscope in the lab. coronavirus

तब्बल ५२० कोरोनाबाधित तर ४३२ रुग्णांनी केली कोरोनावर मात
जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात आजवर आढळून येणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येने आज उच्चांक गाठला असून, आज (दि.१०) कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅब तपासणीचा अहवाल मिळाल्यानंतर नव्याने 520 तर जळगाव शहरात 154 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 14 हजार 863 झाली आहे. दिवसभरात 5 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, 432 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या नवनवे उच्चांक गाठत असून, गेल्या चार महिन्यातील सर्वाधिक 520 कोरोनाबाधित रुग्णांची आज भर पडली आहे. आज आढळलेल्या ५२० रूग्णांमध्ये जळगाव शहर १५४, जळगाव ग्रामीण ३९, भुसावळ १७, अमळनेर ३४, चोपडा १३, पाचोरा ११, भडगाव १६, धरणगाव ६, यावल १३, एरंडोल ४०, जामनेर ७१, रावेर ७, पारोळा ११, चाळीसगाव ५५, मुक्ताईनगर २५, बोदवड ३ इतर जिल्ह्यातील ५ अशी रूग्ण संख्या आहे. दिवसभरात ५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात चाळीसगाव तालुक्यातील २ तर जळगाव शहर, जळगाव तालुका, आणि एरंडोल तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश असल्याची माहिती अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here